Advertisement
नागपूर: अत्यावश्यक देखभाल- दुरुस्ती साठी शुक्रवार दिनांक २७ एप्रिल २०१८ रोजी कर्वे नगर, उज्वल नगर सह पशिचम-दक्षिण नागपूरचा वीज पुरवठा सकाळी ८ ते ११ या काळात बंद राहणार आहे. महावितरणच्या काँग्रेस नगर विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार कर्वे नगर, उज्वल नगर, कन्नमवार नगर, संघर्ष नगर, कबीर नगर,जयताळा,रमाबाई आंबेडकर सोसायटी, जनहित सोसायटी, प्रज्ञा ले आऊट, हिल रोड, गिरीपेठ, गोरेपेठ, वाल्मिकी नगर, टिळक नगर, लॉ कॉलेज चौक, धरमपेठ,भगवाघर ले आऊट,काचिपुरा,बजाज नगर, अभ्यंकर नगर येथील वीज पुरवठा सकाळी ८ ते ११ या काळात बंद राहील. या शिवाय सकाळी ७ ते १० या काळात मालवीय नगर,पांडे ले आऊट,योगक्षेम ले आऊट,खामला न्यू स्नेह नगर येथील वीज पुरवठा बंद राहील. वीज बंदची माहिती ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.