Advertisement
नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम येत्या रविवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा जनसंपर्क ना. गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय प्लॉट नं. 26 सावरकर नगर, खामला चौक, ऑरेंज सिटी हॉस्पिटलच्या विरुध्द बाजूला, ज्युपिटर शाळेजवळ येथे सकाळी 11 ते दुपारी 1.30 या वेळेदरम्यान होईल.
या जनसंपर्क कार्यक्रमात नागरिकांना कोरोनाचे सर्व नियम पाळावे लागणार आहेत.
जनसंपर्क कार्यक्रमात ना. गडकरी नागरिकांना भेटीसाठी उपलब्ध होतील. नागरिकांनी आपल्या समस्येची निवेदने लेखी स्वरूपात सोबत आणावी ही विनंती करण्यात येत आहे.