Published On : Fri, Nov 10th, 2023

नागपुरात धनत्रयोदशीच्या दिवशी सराफ बाजारात सोने-चांदीच्या खरेदीसाठी उसळली गर्दी !

Advertisement

नागपूर : आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. आजपासून दिवाळी सणाला सुरुवात होते. या दिवशी धन्वंतरी देव, लक्ष्मीजी आणि कुबेर महाराज यांची पूजा केली जाते. तसेच या दिवशी सोने -चांदी खरेद करणे खूप शुभ मानले जाते.

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शुक्रवारी (१० नोव्हेंबर) सोने-चांदीचे दागिने खरेदीसाठी नागपुरातील सराफा दुकानांत ग्राहकांची गर्दी उसळली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदीच्या दागिन्यांची पूजा केली जाते.

Advertisement

नागपुरात मध्यंतरी २४ कॅरेटसाठी सोन्याचे दर ६२ हजार रुपये प्रति १० ग्रामवर गेले होते. पण ते खाली आल्यावर ग्राहकांकडून दागिने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. नागपुरात १० नोव्हेंबरच्या सकाळी १०.३० वाजता प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ६० हजार ७०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५७ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४८ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३९ हजार ५०० रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ७२ हजार रुपये आहे.