नागपूर : नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवशी नागपूरकरांनी शहरात ठिकठिकाणी असलेल्या मंदिरात मोठी गर्दी केली. साई मंदिरासह टेकडी गणेश मंदिरात भक्तांच्या मोठमोठ्या रांगा पाहायला मिळाल्या.
नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी सकाळपासूनच वर्धा मार्गावरील साई मंदिर, तेलंगखेडी, रेल्वे स्टेशन जवळील टेकडी गणेश मंदिर, इस्कॉन मंदिर आणि इतवारीतील राधाकृष्ण, बालाजी मंदिर आदी ठिकाणी गर्दी केली होती.
यावेळी मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. यावेळी मंदिर प्रशासनाकडून कोरोना नियमांचे पालन करीत, सामाजिक अंतर पाळून दर्शनासाठी सोय केली होती.
कोट्यवधी नागरिकांच्या आस्थेचं श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणेश मंदिरात भाविकांची मांदियाळी वर्षभरचं असते. नवसाला पावणारा बाप्पा म्हणून देखील टेकडी गणेश प्रसिद्ध आहे. आज तर नवीन वर्ष असल्याने टाळ मृदुगांच्या गजरामुळे वातावरण भक्तिमय झाल्याचे पाहायला मिळाले.