Advertisement
नागपूर: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरातील शासकीय इमारतीवर तिरंग्याची आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.आरबीआय, विधानभवन आणि जिल्हा परिषदेच्या इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.उद्या संपूर्ण देश ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा करणार आहे.
1947 पासून दरवर्षी भारतात 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यांची ७६ वर्षे पूर्ण होत आहेत.
प्रत्येक भारतीय अभिमानाने स्वातंत्र्य दिन साजरा करतो. स्वातंत्र्यदिनाच्या पू्वसंध्येला नागपूरची तरूणाई देशभक्तीच्या रंगात रंगलेली दिसली. संपूर्ण नागपूर शहर तिरंग्याच्या सजावटीने सजले आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधीच शहरात नागपूरकरांचा जल्लोष पाहायला मिळाला.