Advertisement
नागपूर : इंग्रजांच्या जुलमीत राजवटीत दीड हजार गावांमध्ये प्रतिसरकार चालवणारे, संसदेत मराठीत भाषण करणारे पहिले खासदार तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त मनपा तर्फे अभिवादन करण्यात आले.
मनपा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात स्थायी समिती सभापती श्री. विजय (पिंटू) झलके यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन आदरांजली दिली. यावेळेस अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, श्री. संजय निपाणे, उपायुक्त श्री.निर्भय जैन, सुभाष जयदेव आदी उपस्थित होते.