Published On : Wed, Dec 6th, 2023

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनपा तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली

Advertisement

नागपूर :भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. तसेच संविधान चौक येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळयाला सुध्दा माल्यार्पण करुन आदारांजली वाहिली.

या वेळी अति. आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपायुक्त श्री. निर्भय जैन, श्री. रविन्द्र भेलावे, सहा. आयुक्त श्री. महेश धामेचा, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बी. पी. चंदनखेडे, वैद्यकीय आरोग्य अधिकरी श्री. नरेन्द्र बहिरवार आदि उपस्थित होते.

Advertisement