महापौरांनी दिली राष्ट्रीय एकतेची व भ्रष्ट्राचार निर्मूलनाची शपथ
नागपूर ता.३१ : वाल्मीकी रामायण या महाकाव्याव्दारे प्रभू रामचंद्राचे जीवनचरित्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून समाजामध्ये आदर्श राज्याची संकल्पना साकारणार रामायण रचयिता महर्षी वाल्मीकी यांच्या जयंती निमित्त, भारताचे प्रथम गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५ व्या जयंती निमित्त व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ३६ व्या पुण्यतिथी निमित्त म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील महापौर कक्षात झालेल्या कार्यक्रमात मा.महापौर श्री.संदीप जोशी, उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती श्री.विजय (पिंटू) झलके व सत्ता पक्ष नेते श्री.संदीप जाधव, अपर आयुक्त संजय निपाणे यांनी महर्षी वाल्मीकी, सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन नगरीतर्फे विनम्र अभिवादन केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती “राष्ट्रीय एकता दिवस” म्हणून पाळण्यात येतो. त्या निमित्ताने मा.महापौर श्री.संदीप जोशी यांनी उपस्थित पदाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली. तसेच दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त महापौरांनी उपस्थितांना प्रशासनात पारदर्शकता ठेवण्याच्या दृष्टीने सत्यनिष्ठेची व भ्रष्ट्राचार निर्मूलनाची शपथ दिली.
यावेळी डॉ.आंबेडकर फाऊंडेशनचे उपाध्यक्ष श्री.अशोक मेंढे, सर्वश्री राजेश हातीबेड, नरेश खरे, प्रकाश उक्लवार, टोनी बक्सरे, जयसिंह कछवाहा, प्रकाश चमके, सुनील तांबे, मोती जनवारे आदी उपस्थित होते.