Published On : Mon, Nov 27th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात प्रकाश पर्व निमित्त शीख समुदायाकडून काढण्यात आल्या मिरवणुका !

नागपूर:शीख धर्माचे संस्थापक आणि शिखांचे पहिले गुरू गुरुनानक देव यांची 554वी जयंती आज देशभरात साजरी करण्यात येत आहे. या निमित्ताने नागपुरात शीख समजबांधवांकडून प्रकाश पर्व साजरा करण्यात येत आहे.प्रकाशपर्वाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने एकत्रित येत शहरात शीख समुदायाने मिरवणूक काढली.

गुरुनानक यांचा जन्मदिवस शीख समुदायात ‘प्रकाश पर्व’ म्हणून साजरा केला जातो.

Gold Rate
Monday 02 March 2025
Gold 24 KT 85,200 /-
Gold 22 KT 79,200 /-
Silver / Kg 94,400 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या विशेष दिवशी शीख लोक गुरुद्वाऱ्यात जातात. शिवाय ज्या गुरुद्वाऱ्यांमध्ये तळं असेल तिथे स्नान केलं जातं. प्रत्येक गुरुद्वाऱ्यामध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आणि लंगरचं आयोजन केलं जातं. गुरुद्वारे सजवण्यात येतात आणि लोक घरी दिवे लावून हा दिवस साजरा करतात. आज शहारत काढलेल्या मिरवणुकांमध्ये सर्व गुरुद्वारातील जथ्यांनी भजन गायनात सहभाग घेतला.

Advertisement