मौजा : गुमथळा येथे महात्मा ज्योतिबा फुले वाचनालयाचे उद्घाटन 14 मे रोजी पार पडले. यादरम्यान शिवबा राजे फाउंडेशनच्या माध्यमातून ‘गाव तिथे वाचनालय’ मोहिम राबविण्यात येणार आहे.. थोर पुरुषांच्या विचारांची गरज समाजाला असून त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जायचे असेल तर वाचन संस्कृती जोपासणे खूप आवश्यक असल्याचे विधान फाउंडेशनच्या अध्यक्षांनी केले आहे.
केवळ संकल्प करून चालणार नाही तर त्याला कृतीत उतरविणे खुप आवश्यक असते। हाच संदेश शिवबा राजे फाउंडेशननी आपल्या कृतीमधून दिलेला आहे.सदर कार्यक्रमाला चंद्रकांत डाफ ग्रामपंचायत सदस्य गुमथळा, प्रवीण निंबुळकर पोलीस पाटील, विलासजी दाऊस्कर सर, किशोरजी वाघ, मारोती वाघ, भाग्यरथी वाघ प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. तसेच शिवबा राजे फाऊंडेशचे सदस्य आणि महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय गुमथळा येथील संपूर्ण सदस्य उपस्थित होते.