कामठी: पावसाळा लागल्याच्या तोंडावर आज 3 जून ला दुपारी तीन च्या दरम्यान कामठी तालुक्यातील आडका गावात जवळपास अर्धा तास झालेल्या वादळी वारा तसेच विजेचा कडकडाट मध्ये गावात काही वेळ भीतीमय वातावरण पसरले होते दरम्यान ग्रा प सदस्य स्वाती सुभाष खेडकर यांच्या शेतात मेंढ्या चारवणारा मेंढपाळ च्या अंगावर वीज पडल्याने त्या मेंढपाळ वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दुपारी साडे तीन वाजता घडली असून मृतक मेंढपाळ इसमाचे नाव मधुकर गहाणे वय 55 वर्ष रा हिंगणा असे आहे.सदर मृतक हा मागील चार दिवसांपासून जवळपास 50 मेंढ्याचा कळप घेऊन शेतात तळ ठोकून होता तर दोन दिवसानंतर दुसऱ्या ठिकाणी हा मेंढ्याचा कळप घेऊन स्थानांतरण करणार होता मात्र आजच्या या वादळी वारा व विजेच्या कडकडाट च्या घटनेत प्राणज्योत मालवली तर सुदैवाने जवळ असलेल्या कुठल्याही मेंढ्यावर वीज न पडल्याने मेंढ्यावरचो जीवितहानी टळली.
काही वेळानंतर वादळी वाऱ्याची स्थिती थांबल्या नंतर गावकऱ्यांनी मोकळा श्वास घेतला तर वीज पडून एका मेंढपाळ इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच आडका ग्रा प सरपंच भावना चांभारे, प्रा अवंतीकाताई लेकुरवाडे, केम ग्रा प उपसरपंच अतुल बाळबुधे, विजय खोडके, निरंजन खोडके, विष्णू नागमोते आदींनी मदतीचो धाव घेतली व तहसीलदार अरविंदकुमार हिंगे यांना घटनेची माहिती देत मृतक मेंढीपाळ इसमाला नैसर्गिक आपत्ती नुकसानग्रस्त निधी चा लाभ देण्यात यावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली.
– संदीप कांबळे कामठी