Published On : Thu, Dec 7th, 2023
By Nagpur Today Nagpur News

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळासमोर मुख्यमंत्री शिंदेंचे भव्यदिव्य पोस्टर ; राजकीय चर्चेला उधाण

Advertisement

नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या समोर लावण्यात आलेल्या एका पोस्टरमुळे राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. हे पोस्टर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे.

मागील वर्षी याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे २ वेगळे पोस्टर्स लावण्यात आले होते. यातील फडणवीस यांचे पोस्टर मुख्यमंत्र्याच्या पोस्टरच्या तुलनेत जास्त उंच होते. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

Gold Rate
Friday 07March 2025
Gold 24 KT 86,300 /-
Gold 22 KT 80,300 /-
Silver / Kg 97,700 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आजपासून पुढील १ दिवस नागपुरात राजकीय घडामोडी घडणार आहेत. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांध्ये खडाजंगीही पाहायला मिळेल.

Advertisement