Advertisement
नागपूर: रेल्वे स्थानकावर बेशुध्दावस्थेत आढळलेल्या ४० वर्षीय वयोगटातील इसमाचा मृत्यू झाला. रेल्वे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. ही दुर्देवी घटना आज शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. मृताची अद्याप ओळख पटली नाही.
रेल्वे स्थानकाच्या पश्चिम प्रवेशव्दाराकडील पार्किंग परिसरात एक ४० वयोगटातील इसम बेशुध्दावस्थेत होता. रेल्वे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतकाच्या उजव्या हातावर मनोहर राजोरी आंबोरा या नावानसोबतच ओम चे चिन्ह गोंदविलेले आहे.
या प्रकरण लोहमार्ग पोलिसांनी नोंद करून शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविले आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल परमानंद वासणिक करीत आहेत.