कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय महा मार्गावरील डुमरी स्टेशन चौकात अवैध रीत्या ट्रक मध्ये बकऱ्या डांबुन नेणा-या ट्रक व कोळसा ट्रकच्या अपधात शंभर पेक्षा जास्त बकऱ्या मुक्या जनावरांचा मुत्यु.
कन्हान पो स्टेशन अंतर्गत नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वरील डुमरी स्टेशन चौकात कोळसा भरलेला दहा चाकी ट्रक क्र एम एच २० ए टी २९१२ एकाएक डुमरी कोळसा यार्ड कड़े वळला असता मध्य प्रदेशा कडुन नागपुर कड़े अवैध रीत्या दहा चाकी ट्रक क्र एम एच ४० एन ४८७७ मध्ये बक-या भरून नेणा-या ट्रकची जोर दार धडक झाली यात जवळपास शंभर पेक्षा जास्त बोकुड व बकऱ्या मुकया जमावराचा मुत्यु झाला. कोळसा ट्रक चालक घटनास्थळावरुन पळ काढला असुम मागुन बक-या भरून येणारे चार ट्रक मागे परतले.
या महामार्गाने रात्रीच्या वेळ पाहुन मोठया प्रमाणात अवैध जनावरांची मध्य प्रदेशातुन नागपूर कड़े वाहतुक सुरू असल्याचे ताजे उदाहरण सामोर आले अंसुन पोलीस विभाग मुग गिळत गप्प का ? नागरिकात चांगलीच चर्चा रंगताना दिसंत आहे