नागपूर : नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत पैशांच्या तसेच दारू पिण्याच्या वादातून एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दारू पिण्याच्या आणि पैशांच्या वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले. नीरज भोईर (३०) असे मृतकाचे नाव आहे. रात्री ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
माहितीनुसार, नीरज व त्याचा मित्र विशाल राऊत (३२) वर आरोपींनी हल्ला करत वार केले. दोघांचाही मृत्यू झाल्याचे समजून आरोपी फरार झाले. दोन्ही जखमींना दवाखान्यात नेण्यात आले. मात्र नीरजला मृत घोषित करण्यात आले. तर विशालची प्रकृती गंभीर आहे.या घटनेची माहिती मिळताच शाखेचे उपायुक्त निमित गोयल, झोन चारचे उपायुक्त विजयकांत सागर घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करण्यात तसेच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.