नवी दिल्ली : एक देश, एक निवडणूक विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आला. लोकसभेच्या कामकाजाच्या १७ व्या दिवशी केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ‘एक देश एक निवडणूक’ या विधेयकासाठी १२९ वी घटना दुरूस्ती विधेयक मांडलं. एक देश, एक निवडणूक विधेयकाचा लोकसभेत स्वीकार करण्यात आला आहे. आवाजी मतदानाद्वारे ही निवडणूक पार पडली. 269 मतं विधेयकाच्या बाजूने तर 198 मतं विरोधात मिळाली. भारतात लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका वेगवेगळ्या वेळी होतात.
एक देश, एक निवडणूक म्हणजे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या एकाचवेळी निवडणुका. म्हणजेच लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांचे सदस्य निवडण्यासाठी मतदार एकाच दिवशी, एकाच वेळी मतदान करतील.स्वातंत्र्यानंतर 1952, 1957, 1962 आणि 1967 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या, परंतु 1968 आणि 1969 मध्ये अनेक विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित झाल्या. त्यानंतर डिसेंबर 1970 मध्ये लोकसभाही विसर्जित करण्यात आली.
त्यामुळे एक देश, एक निवडणुकीची परंपरा खंडित झाली.आतापर्यंत देशात लोकसभा आणि विधानसभेच्या मिळून ४०० पेक्षा जास्त निवडणुका झाल्या आहेत. पण केंद्र सरकार इथून पुढं एक देश एक निवडणूक ही संकल्पना आणत आहे. त्याचा रोडमॅप उच्चस्तरिया समितीने तयार केला आहे. यामुळे खर्च आणि वेळेत बचत होणार असल्याचे बोलले जात आहे.