Advertisement
नागपूर: शहारत दिवसेंदिवस हत्याचे सत्र सुरूच आहे.
गुन्हेगारीच्या घटना काही कमी होताना दिसत नाही.नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पडोळे नगर येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.विकेश सुखदेव जाधव मृतकाचे नाव असून तो शास्त्रीनगर येथील निवासी आहे. या घटनेने परीसरात खळबळ उडाली असून नंदनवन पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान विकेशची हत्या का आणि कुणी केली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे.