सीताबर्डी मित्र मंडळाच्या वतीने सीताबर्डी मेन रोड स्थित श्रीमंत बुटी महाद्वार येथे भव्य गुढी पुजन करण्यात आले.
हिंदू वर्ष प्रतिपदेच्या उत्सवाला मुख्य अतिथी माजी महापौर, प्रसिद्ध वक्ते श्री दयाशंकर तिवारी उपस्थित होते. संघ संस्थापक डॉ हेडगेवारांच्या जन्मतिथीचे स्मरण करून अभिवादन करतांना डॉ हेडगेवारांच्या अतुलनीय संघकार्यामुळे आज हिंदू समाज संघटित झालेला आहे.
हिंदू समाजातील प्राचीन मुल्यांच्या रक्षणासाठी अग्रेसर राहिले पाहिजे असे ते म्हणाले गुढीचे पुजन आणि श्रीरामाची आरती करण्यात आली. संपूर्ण परीसर भारत माता की जय च्या जयघोषाने दुमदुमला.
कार्यक्रमा प्रसंगी सीताबर्डी मित्र मंडळाचे अध्यक्ष दिनेश गावंडे, माजी नगरसेवीका उज्वला शर्मा, जेष्ठ कार्यकर्ते कृष्णा पांडे, माजी नगरसेवक राजु भलावी, प्रकाश शर्मा, विश्वनाथ अभ्यंकर, अमोल तपासे, अमर पारधी, समीर अवधाने, मुकेश मोहबे, विनोद माहुले,धनंजय डेग्वेकर, पुनम मोहबे, प्रिती यादव, अजय मुंजे, सतिश वैष्णव, उमेश नागभिडकर, प्रकाश माहुले, कैलाश छाबरिया, सचिन अवधाने आदी मोठ्या संख्येने नागरीकांनी सहभागी झाले.