Published On : Sat, Jun 16th, 2018

नागपूर बातम्या : जंगल सफारीची ऑनलाईन बुकिंग आजपासून बंद

Advertisement
jungle-safaris

File Pic

नागपूर : विदर्भात अचानक झालेल्या पावसामुळे जंगल सफारी सध्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१ जून ते १० जून दरम्यान झालेल्या पावसामुळे पर्यटन स्थळांची स्थिती बरोबर नाही. त्यामुळे पेंच व बोर व्याघ्र प्रकल्प तसेच उमरेड-पवनी-कऱ्हांडला आणि टिपेश्वर अभयारन्य येथील जंगल सफारीची ऑनलाईन बुकिंग १६ ते ३० जूनपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.

जंगल सफारीचा आनंद लुटण्या करीत तेथील रस्ते सुस्थितीत असणे आवश्यक असते. परंतु, अचानक झालेल्या पावसाने विदर्भातील व्याघ्र प्रकल्प व अभयारण्यातील रस्त्यांची स्थिती फार खराब झाली आहे. त्यामुळे १६ जून ते ३० जून दरम्यान ओनलाईन बुकिंग बंद करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.

Gold Rate
Friday 07March 2025
Gold 24 KT 86,300 /-
Gold 22 KT 80,300 /-
Silver / Kg 97,700 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मात्र, या कालावधीत स्थानिक परिस्थितीनुसार रस्ते योग्य राहिल्यास पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प तसेच उमरेड-कऱ्हांडला व टिपेश्वर अभयारण्यात प्रवेशद्वारावरून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश सुरु ठेवण्यात येईल. शिवाय यापूर्वी ऑनलाईन बुकिंग केलेल्या पर्यटकांनाही रस्ता सुरु असल्यास प्रवेश दिला जाईल, असे वनविभागाने स्पष्ट करून सांगितले आहे.

Advertisement