Published On : Sun, Jan 2nd, 2022
By Nagpur Today Nagpur News

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ३ जानेवारीला ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Advertisement

स्वयम् सामाजिक संस्था व माय करिअर क्लबतर्फे आयोजन

नागपूर: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सोमवारी (ता. ३) सकाळी १०.३० वाजता स्वयम् सामाजिक संस्था व माय करिअर क्लबच्या वतीने पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा पूर्वतयारीबाबत ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी लोखंडे व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विक्रम आकरे हे पोलीस भरती तसेच स्पर्धा परीक्षेबाबत युवक-युवतींना मार्गदर्शन करतील.

आगामी काळात राज्यामध्ये शिक्षक अभियोग्यता चाचणी (टेट), भूमि अभिलेख विभाग १०१३ पदे, मुंबई हायकोर्ट २४७ पदे, एमपीएससी गट-क ९०० पदे तसेच पोलीस विभागात १३००० पदांची भरती केली जाणार आहे. पोलीस भरतीचे बदललेले स्वरूप, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम, मैदानी चाचणीची तयारी तसेच पोलीस सेवेत असलेल्या विविध संधी आणि आव्हानांबाबत सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी लोखंडे मार्गदर्शन करतील. तर विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षेची तयारी केव्हापासून सुरू करावी, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम कसा समजून घ्यावा, मेरिट गुण मिळविण्यासाठी अभ्यासाचे नियोजन कसे करावे, कोणती संदर्भपुस्तके वाचावीत इत्यादींबाबत विक्रम आकरे मार्गदर्शन करतील. शहरासह गावखेड्यांतील युवक-युवतींना मार्गदर्शन मिळावे म्हणून ऑनलाईन माध्यमातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसेवेचे ध्येय बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या युवक-युवतींनी मोठ्या संख्येने या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन स्वयम् सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी केले आहे. ऑनलाईन कार्यशाळेची लिंक मिळविण्यासाठी ७७२००४४२४४ / ९८२३४१८४५७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Advertisement