नागपूर: आॅन लाईन रेल्वे तिकीटांवरील मुळ किंमत बदलून त्या एैवजी नवीन किंमत घालून प्रवाशांची लुबाळणूक करणाºया दोन ट्रॅव्हल्स संचालकाच्या दुकानावर आरपीएफ छापेमार कारवाई करीत ३ लाख ९५ हजार ८९० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही संयुक्त कारवाई मध्य आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या पथकाने खापरखेडा परिसरात केली. अशी माहिती वरिष्ठ सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतीजा आणि सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
सेवकराम डाखरे, (३२), समीरलाल राधेश्याम प्रसाद (३२, दोन्ही रा.खापरखेडा) असे ट्रॅल्वल्स संचालकांची नावे आहेत. सेवकराम याचे श्रीराम ट्रॅवल्स तर समीरलाल याचे प्रसाद र्सिवसेस नावाचे दुकान खापरखेड येथे आहेत. विशेष म्हणजे दोघेही आयआरसीटीसीचे अधिकृत एजंट आहेत. ते ई-तिकीटांचा काळाबाजार करीत असल्याची गुप्त माहिती दपूमरेचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांना मिळाली. त्यांनी आरपीएफ निरीक्षक गणेश गरकर यांच्या नेतृत्वात एक पथक नेमले. पथकाने श्रीराम ट्रॅव्हल्स आणि प्रसाद सर्विसेस या दुकानात धाडी टाकल्या. दोन्ही दुकानात बनावट आडीवर ई-तिकीटांचा काळाबाजार होत असल्याचे आढळले. एढेच नव्हे तर मोजक्या ई तिकीटांची मुळ प्रिंटला एडीट करुन नवि प्रिंट प्रवाशांना देत होते. नव्या प्रिंटवर मुळ किंमतीपेक्षा अधिक किंमत घालत असल्याचेही स्पष्ट झाले.
श्रीराम ट्रॅव्हल्सची झडती घेतली असता जवळपास ३३ हजार ८९० रुपये किंमतीच्या २० ई तिकीट आढळल्या. त्यांच्या दुकानातील १ कम्प्युटर, १ डोंगल, १ मोबाईल, आणि रोख एक हजार ६०० रुपए जब्त करण्यात आले. तर प्रसाद सर्विसेस येथून २१२ ई-तिकीट आणि ३५ बनावट आयडी सह रोख एक हजार ६०० रुपए आणि २ कंम्प्युटर आणि एक मोबाईल असा एकून ३ लाख ६२ हजार रूपयांचा मुद्देमाल जब्त करण्यात आला. दोघांनाही अटक करून रेल्वे कायद्याच्या १४३ कलम अंतर्गत कारवाई करण्यात आली. पुढेही अशाच प्रकारची कारवाई सुरु राहील, असे सतीजा आणि पांडे यांनी सांगितले. विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे नेतृत्वाखाली गणेश गरकर, उपनिरिक्षक होतीलाल मीणा, प्रधान आरक्षक सतीश इंगळे, अरविंद टेंभुर्णिकर, राहुल सिंह, पी.न. राशेडाम, आरक्षक प्रदिप गाढवे, अमित बारापात्रे, अश्विन पवार, अशोक खॉन, ओमेश्वर चौव्हान यांनी केली.