Published On : Mon, Oct 26th, 2020

राजकारण म्हणजे शत्रुंमधील युद्ध नव्हे, विवेक पाळा

Advertisement

नागपूर : सद्यस्थितीत देशातील राजकारणाच्या स्तराबाबत अप्रत्यक्षपणे चिंता व्यक्त करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी सर्वपक्षीय नेत्यांचे कान टोचले आहेत. सत्ताप्राप्तीसाठी प्रयत्न करणे यात नवीन काही नाही. मात्र त्या प्रक्रियेत विवेकाचे पालन आहे. राजकारणातील स्पर्धा ही शत्रूंमध्ये चालणारे युद्ध नाही. स्पर्धा निकोप व्हायला हवी व त्यामुळे समाजात कटुता निर्माण होऊ नये.अशा स्थितीचा लाभ देशात कलह निर्माण करणारे देशविदेशातील तत्व घेतात याची जाण सर्वांनी ठेवली पाहिजे, असे परखड मत सरसंघचालकांनी व्यक्त केले. कोरोनाचा संसर्ग असल्याने रेशीमबाग मैदानाऐवजी डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात आयोजित संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवादरम्यान ऑनलाईन उद्बोधनादरम्यान ते बोलत होते.

Gold Rate
16April 2025
Gold 24 KT 95,000/-
Gold 22 KT 88,400/-
Silver / Kg - 96,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विविधतेत एकता ही भारताची ताकद आहे. मात्र अल्पसंख्यांक तसेच अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांमध्ये द्वेषपूर्ण गोष्टी पसरवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. ‘भारत तेरे टुकडे होंगे’ अशा घोषणा देणारे लोक या कारस्थानी मंडळींमध्ये सहभागी आहेत. शासन-प्रशासनाच्या कुठल्या निर्णयावर किंवा समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांवर विरोध दर्शवत असताना राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव व सन्मान ठेवला पाहिजे. असे सरसंघचालक म्हणाले. यावेळी मंचावर विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, सहसंघचालक श्रीधर गाडगे उपस्थित होते.

अतिथी, पथसंचलन व कवायती नाहीत
कोरोनामुळे यंदा पथसंचलन व कवायती झाल्याच नाही. शिवाय यंदा कुठल्याही अतिथींनादेखील निमंत्रित करण्यात आले नव्हते. सभागृहात केवळ ५० पदाधिकारी, स्वयंसेवक व घोष पथकातील सदस्य उपस्थित होते. स्वयंसेवकांनी घराजवळच गटनिहाय विजयादशमी उत्सव साजरा केला.

तर हिंदूऐवजी दुसरा शब्द वापरा
फुटीरतावादी व समाजाला तोडण्याचा प्रयत्न करत असलेले तत्व जाणुनबुजून ह्यहिंदुत्वाला ह्य तिरस्कार व टीकेचा पहिला निशाणा बनवितात. हिंदू कोणताही पंथ, संप्रदाय, जाती किंवा प्रांताचा पुरस्कार करणारा नसून सर्वांना जोडणारा शब्द आहे. या शब्दावर कुणालाही आक्षेप असू शकतो. आशय सारखा असेल तर इतर शब्दांच्या उपयोगावर आम्हाला कुठलाही आक्षेप नाही, असे डॉ.मोहन भागवत यांनी प्रतिपादन केले.

मोदी सरकारची थोपटली पाठ
स्वदेशी, स्वावलंबन, नवीन शिक्षण धोरण या मुद्दयांवर सरसंघचालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारची पाठ थोपटली. शासनाचे कामकाज पारदर्शक असून जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याची क्षमता सरकारमध्ये आहे

Advertisement
Advertisement