कन्हान : – संपुर्ण भारतात कोरोना विषाणुचा प्रसार वाढत असल्याने तो रोखण्याकरिता प्रतिबंधक उपाय, सामा जिक अंतर म्हणुन दि.२५ मार्च ते १४ एप्रिल असे२१ दिवसाकरिता संपुर्ण देशात लॉक डाऊन करण्यात आल्याने गाव, शहरे सर्वत्र सुनसान आहे. या लढयात गरिब, गरजु नागरिकांच्या उपासमारीचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना जेवणाची व राहण्याची सुध्दा व्यवस्था करून त्यांना जगविणे अंत्यत गरजेचे आहे. गरजु नागरिक व कुटुंब जगेल तरच मानुष्की जगेल.
सर्वत्र कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भावा मुळे हाहाकार माजला आहे. यात सर्वात जास्त उपासमारीने बेहाल, नुकसान झोपडपट्टी, गरीब लोकवस्ती तील हात मजुर, बांधकाम, घरकाम, कबाडी, खाजगी वाहन चालक, खाजगी मजुरवर्ग, शेत मजुर, छोटे दुकानदार, परप्रांतिय मजुर, रोज कमाई करून खाणाऱ्या बांधवांचे होत आहे. तसेच अंध, अपंग, भिखारी यांचे चार दिवसात च भयंकार पोटा पाण्याचा प्रश्व निर्माण झाला आहे. आपण यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे. ते आपण व सेवा भावी संस्था मानुष्की म्हणुन करित आहो. परंतु बर-याचशा कुटुंबा पर्यंत ही मदत पोहचणे शक्य नाही.
२१ दिवसाच्या लॉकडाऊन काळात शासकीय मदत पोहचली नाही तर उपासमारी मुळे या अंत्यत गरीब, गरजु कुटुंबाची जिवहानी होऊ नये. यास्तव शासना व्दारे लॉक डाऊन मुळे निराधार झालेल्या रोज काम करून पोट भरणा-या गरजु नागरिक त्या च्या कुटुंबानी दोन वेळ जेवण, आरोग्य सेवा व ज्यांना राहण्याची व्यवस्था नाही अश्याना राहण्याची व सर्व व्यवस्था युध्द पातळीवर भारत सरकार, राज्य शासना ने स्थानिक तहसिलदार, गट विकास अधिकारी, मु़ख्याधिकारी, तलाठी, ग्राम सेवक, शासकीय कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी, सदस्य यां च्या सहकार्याने त्वरित करण्यात यावी. आवश्यकता असल्यास शाळा, महाविद्या लय तसेच निमशासकीय पदाधिकारी, कर्मचा-यांची मदत घ्यावी. आणि या गरजु नागरिकांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था त्वरित करून मदत करावी.जेणे करून ही आपली कुटुंबे जगु शकतील. गरजु नागरिक कुटुंबे जगतील तरच मानुष्की जगेल.