Published On : Tue, Dec 26th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नटराज क्रीडा मंडळ बेला येथे खुली कबड्डी स्पर्धा तालुका प्रतिनिधी: दिलीप घिमे

Advertisement

बेला : उमरेड तालुक्यातील बेला गावाची ओळख क्रीडा क्षेत्रात अग्रण्य आहे , बेलात ऑक्टोंबर १९७७ नटराज क्रीडा मंडळ स्थापना करण्यात आली यातील खेळाडूंनी विदर्भ स्तरीय , राज्यस्तरीय अनेक स्पर्धेमध्ये सुयश मिळवले त्या काळी नटराज क्रीडा मंडळाचा विदर्भात एक दरारा होता तो काळ क्रीडा मंडळासाठी सुवर्णयुग होता मंडळांनी अनेक विदर्भस्तरीय व राज्यस्तरीय कबड्डीचे खेळाडूना घडविले आणि स्पर्धेचे आयोजन सुद्धा यापूर्वी केलेली आहे

मागील तीन वर्ष कोविडं असल्यामुळे स्पर्धेचे आयोजन करू शकले नव्हते पण नव्या जोमाने नवीन खेळाडूंनी यावर्षी खुल्या ५० किलो आणि ५८ किलो वयोगटात कबड्डी स्पर्धेचे आयोजन २४ आणि २५ डिसेंबरला करण्यात आले होते त्यानिमित्ताने २४ डिसेंबरला खुल्या कबड्डी स्पर्धेचे विधिवत उदघाटन करण्यात आले ग्रामीण भागातील युवकांची खेळाडू वृत्ती जागृत करण्यासाठी व खेळाडूंचा सक्रिय सहभागासाठी बेला येथे रविवार व सोमवारी ला कबड्डी स्पर्धा घेण्यात आली

Advertisement
Wenesday Rate
Wed 25 Dec. 2024
Gold 24 KT 76,300/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यामध्ये ५० किलो वयोगटात ५५ संघ तर ५८ किलो वयोगटात १५ संघांनी सहभाग नोंदविला या स्पर्धेचे उ‌द्घाटक व कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थान बेला ग्रामपंचायत सरपंच अरुण बालपांडे तर प्रमुख पाहुणे जयकुमार वर्मा माजी जिल्हा परिषद सदस्य ,पुष्कर डांगरे पंचायत समिती सदस्य, अजित कदम ठाणेदार पोलीस स्टेशन बेला, राजेश लोहकरे प्रशांत नागोसे सामाजिक कार्यकर्ता महेंद्र तेलरांधे युवा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रदीप शेंडे वर्धा जिल्हा कबड्डी असोसिएश अध्यक्ष उपस्थित होते, मंडळाचे वरिष्ट खेळाडू दादा शेंडे, ज्योतिकुमार देशमुख दिवाकर गवते ,महादेव मरसकोल्हे शाम फाळके, विजय महाजन, पुरुषोत्तम चिंचुलकर, गणेश मेंडुले, चंदू उईके, विनोद चौधरी, अल्केश उरकुडे, रोशन तेलरांधे, प्रज्वल देशमुख, यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोयर गुरुजी तर प्रास्ताविक लीलाधर झिले यांनी केले आभार प्रदर्शन कृष्णा गवळी सर यांनी केले

Advertisement