बंगळुरू: येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारविरोधात विरोधकांनी मोट बांधली आहे. यासंदर्भात रणनीती आखण्यासाठी विरोधकांनी कर्नाटकच्या बंगळुरू शहरामध्ये बैठक घेतली. विरोधकांच्या या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सत्ताधाऱ्यांच्या एनडीएला (NDA) टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया (INDIA) आघाडी उभारली आहे. अर्थात इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुझिव्ह अलायन्स असे या आघाडीचे नाव आहे.
इंडियामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, जेएमएम, आम आदमी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सीपीआय, सीपीएम सारखे तब्बल 26 राजकीय पक्ष सहभागी झाले आहे.
विरोधी पक्षाच्या या बैठकीदरम्यान सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीने सर्वांचे लक्ष वेधले. विरोधी पक्षाच्या बैठकीमध्ये सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात देखील चर्चा झाली.