Published On : Fri, Jan 17th, 2025
By Nagpur Today Nagpur News

समृद्धी महामार्गाला विरोध; शेकडो शेतकऱ्यांचा लाखांदूर तहसील कार्यालयावर धडक

Advertisement

नागपूर : भंडारा: भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील शेकडो शेतकऱ्यांनी लाखांदूर तहसील ते गडचिरोली जिल्ह्यापर्यंतच्या समृद्धी महामार्गाच्या बांधकामाला विरोध केला. या संदर्भात शेकडो शेतकऱ्यांनी लाखांदूर तहसील कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांनी यावेळी तहसीलदार वैभव पवार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले.

भंडारा ते गडचिरोली हाय स्पीड हायवे लाखांदूरमधून जात असून संबंधित विभागाने जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु या रस्त्यासाठी भूसंपादनापूर्वी शेतीच्या जमिनीच्या किमतीची माहिती अद्याप देण्यात आलेली नसल्याने शेतकरी गोंधळलेले आहेत.

Gold Rate
Friday 17 Jan. 2025
Gold 24 KT 79,500 /-
Gold 22 KT 73,900 /-
Silver / Kg 91,400 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याशिवाय, सरकारने जबरदस्तीने शेतांची मोजणी सुरू केल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांना शेत मोजणीसाठी शेतात उपस्थित राहावे लागेल अन्यथा शेतकऱ्यांकडून पुन्हा पैसे वसूल केले जातील. असे पत्र दिल्यानंतर शेतकरी संतप्त झाले आहेत.

लाखांदूरमध्ये सिंचनाची सुविधा आहे. येथील शेती बारमाही पिकांवर आधारित आहे. समृद्धी महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची शक्यता आहे. एक रुपयाही न देता सरकार आमच्यावर अत्याचार करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा. तसेच आमच्याशी चर्चा करावी आणि बैठकीसाठी वेळ द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

Advertisement