नागपूर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह इतर प्रादेशिक पक्षांनी भाजप सरकारविरोधात मोट बांधली आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडकून टीका केली.
विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी म्हणजे ‘बारुद नसलेला बॉम्ब’ असून, त्यांच्याकडून काहीच होणार नाही,असे म्हणत बावनकुळे यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले.
इंडिया आघाडीचे घटक पक्ष मुंबई बैठकीसाठी एकत्र आले आहे. ही त्यांची नौटंकी असून, ते मुंबईत येतील, हॉटेलमध्ये राहतील, दोन दिवस फिरतील आणि निघून जातील. पंतप्रधान मोदींच्या विरोधात महाराष्ट्रात काही करता येईल का? असा त्यांचा प्रयत्न आहे.
मात्र, महाराष्ट्रात भाजपाच्या ४५हून अधिक लोकसभा जागांवर विजय होईल, असा दावा बावनकुळे यांनी केला. कर्नाटकच्या जनतेला काँग्रेसने फसविले – कर्नाटक निवडणुकीत जे आश्वासन काँग्रेसने तेथील जनतेला दिले आहे, ते कधीही पूर्ण करू शकणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले.
image.png