Advertisement
नागपूर : विदर्भातील सर्व जिल्ह्यात आजपासून तर 25 जून पर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
यासाठी हवामान विभागाने वर्धा, वाशिम, यवतमाळ, जालना, परभणी, अमरावती, भंडारा, हिंगोली, नांदेड, अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला.
मुंबई, पुण्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यासोबतच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.