नागपूर : महाराष्ट्रात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपानेही पक्ष संघटनेत बदल करत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली. यातच संघटनात्मक रचनेतील महत्त्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली आहे. यात अनेक बड्या नेत्यांना धक्का बसल्याचे चिन्ह आहे.
भाजप नागपूर शहराध्यक्षपदी बंटी कुकडे तर जिल्हाध्यक्षपदी सुधाकर कोहळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विभाजन करून एका जिल्ह्यात दोन-तीन अध्यक्ष भाजपाने दिले असल्याची माहिती समोर येत आहे.