नागपूर : राष्ट्रीय सेवा योजना दंत महाविद्यालय तर्फे ५६ व्या वर्धापनदीनी माजी विध्यार्थी डॉ.हुसेन हाफिजी यांच्या स्मरनार्थ भव्य रक्तदान शिबीर आयोजित करत शासकीय वैधकीय महाविद्यालयाच्या आदर्श रक्तपेटीला मौल्यवान रक्तसाठा दिला.
कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर, विभागप्रमुख डॉ. मंजुषा वऱ्हाडपांडे, रक्तपेढी प्रमुख डॉ. अर्चना देशपांडे, प्रभारी डॉ. प्राजक्ता पवार, सहप्रभारी डॉ. संजय चव्हाण यांनी सर्व दंत चे अध्यापक व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.
रक्तदानाचे महत्व सांगत डॉ. अभय दातारकर यांनी ‘रक्तदान’ हे सर्वश्रेष्ठ दान असून हा एक सुखदायी अनुभव असतो व त्याचे शास्त्रीय कारण म्हणजे हैप्पी हार्मोन्सचा स्त्राव असे मार्गदर्शन करीत विध्यार्थ्यांना प्रेरणा दिली. कार्यक्रमाच्या यशाकारिता रासेयो चे प्रभारी डॉ. योगेश राठोड, सहप्रभारी डॉ.सचिन खत्री, विध्यार्थी नरेंद्र, अभिषेक, संपती, यश, स्वनिल, साकिब, रौनक यांनी परिश्रम केले.