Published On : Sun, Apr 25th, 2021

माजी मंत्री संजय देवतळे यांचे कोरोनामुळे निधन

चंद्रपूर : जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच भाजप नेते संजय देवतळे (Sanjay Deotale) यांचे आज (25 एप्रिल) निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मागील काही दिवसांपूसन त्यांच्यावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. (Former minister Sanjay Deotale passes away due to heart attack was infected with Corona virus)

मागील 6 दिवसांपासून उपचार, अचानक हृदयविकाराचा झटका

Gold Rate
Saturday 01 Feb. 2025
Gold 24 KT 82,700 /-
Gold 22 KT 76,900 /-
Silver / Kg 94,100 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संजय देवतळे यांना कोरोनाची लागण होण्यापूर्वी त्यांच्या घरातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर खबरदारी म्हणून त्यांची चाचणी करण्यात आली होती. यामध्ये कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मागील सहा दिवसांपसून हे उपचार सुरु होते. मा६, आज अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले.

संजय देवतळे यांची राजकीय कारकीर्द

संजय देवताळे यांच्या अकाली निधनामुळे सर्व स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे. ते 4 वेळा काँग्रेसच्या तिकिटावर वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासह राज्याच्या पर्यावरण मंत्रिपदाचा कारभारासुद्धा त्यांनी सांभाळला होता. त्यानंतर त्यांनी 2014 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. यावेळी मात्र, त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2019च्या निवडणूक त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढवली होती. पुन्हा शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत देवतळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपत नुकताच प्रवेश केला होता.

Advertisement