नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या तोंडावर पत्रकार परिषद घेऊन पक्षाची खाती फ्रीज करण्यात आल्याने संताप व्यक्त केला. या निवडणुकीत आम्ही प्रचारही करु शकत नाही, आमचे नेते प्रवासही करु शकत नाहीत. रेल्वे तिकीटासाठीही पैसे नाहीत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.आज ते दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, अजय माकन उपस्थित होते.
राहुल गांधी म्हणाले, विना बँक खाते आम्ही निवडणूक कशी लढणार, जर तुमच बँक खाते बंद केले, एटीएम बंद केले तर तुम्ही जगणारा कसे? आम्ही ना प्रचार करु शकतं, ना प्रवास करु शकतं, ना नेत्यांना पैसा देऊ शकत, असेही राहुल गांधी म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या दोन महिन्या अगोदर काँग्रेसच्या बँक खात्यावर कारवाई करणे म्हणजे काँग्रेसला निवडणूक लढवूच द्यायची नाही,असा अर्थ निघत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. एक महिन्यापूर्वी काँग्रेसची सर्व खाती फ्रीज केली आहेत. काँग्रेससोबतच अन्याय सुरू आहे. निवडणूक आयोग यावर शांत आहे, असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला.