Published On : Thu, Jun 20th, 2024

लोकसभेत आमच्या सुप्रियाला पंतप्रधान मोदींपेक्षा जास्त मतं मिळाली; शरद पवारांचे विधान

Advertisement

बारामती: लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी लेकीच्या विजयाची आकडेवारी मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.

Advertisement

देशाचे पंतप्रधान दीड लाख मतांनी निवडून आले आहेत. तर सुप्रिया सुळे 1 लाख 54 हजारांनी निवडून आली.देशाच्या पंतप्रधानांपेक्षा सुप्रिया सुळे जास्त मतांनी निवडून आल्या आहेत, असे शरद पवार म्हणाले. ते बारामतीत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

सुप्रिया सुळे यांची चौथी निवडणूक असताना देखील प्रचंड मतांनी विजयी केले. बारामतीमधील जनतेला कोणते बटन दाबायच हे सांगावे लागत नाही, असे पवार म्हणाले आहेत.