नागपूर : देशातील सर्वच भागात जमिनी बाबतच्या मालकी हक्काबद्दल नेहमीच वाद उद्भवत असतात. तसेच, गरिबांच्या जमिनींवर जबरदस्तीने कब्जा केल्याची प्रकरणे देखील पहायला मिळतात. इत्यादी सारख्या गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारने देशपातळीवर स्वामित्व योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात या योजनेचा शुभारंभ २७ जानेवारीला होणार असल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातील प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. स्वामित्व योजने अंतर्गत देशातील सर्व ग्रामीण भागातील जमिनींचे ड्रोनद्वारे मोजमाप केले जाईल आणि गावातील प्रत्येक मालमत्तेचा डिजिटल नकाशा तयार केला जाईल. उपलब्ध कागदपत्रांच्या पुराव्यानुसार संबंधित मालकाला / शेतकऱ्याला त्याच्या जमीन मालकीचे प्रमाणपत्र (ई-प्रॉपर्टी कार्ड) दिले जाईल, असे बावनकुळे म्हणाले.
देशभरात स्वामित्व योजनेचा शुभारंभ २७ जानेवारीला होणार आहे. महाराष्ट्रातही यानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महायुतीचे मंत्री त्या त्या कार्यक्रमात सहभागी होतील. तर नागपुरातील कार्यक्रमात बावनकुळे स्वतः सहभागी होणार आहेत.
सर्व जिल्ह्यात डिजिटल पद्धतीने जिल्हाधिकारी ठरवतील त्या ठिकाणी हे कार्यक्रम पार पडतील.महाराष्ट्र आणि देशभराच्या सर्व मंत्री त्यांच्या जिल्ह्यामध्ये शुभारंभ करणार आहेत. लाभार्थ्यांना जमिनीतील वाद विवाद, मालकी हक्काचे वाद विवाद, घराचे पट्टे नसणाऱ्यांना प्रॉपर्टी कार्ड नसल्यानं फसवणुकीचे प्रकार होत आहे. वडिलोपार्जित मालकीचे कार्ड वाटप या कार्यक्रमांतर्गत होणार आहे.महाराष्ट्रमध्ये 30 जिल्ह्यात 30 हजार गावात योजनेचं डिजीटलाईज होईल. यानुसार नकाशे उपलब्ध करुन देणे, स्पष्टता येणे, गावपातळीवर बांधकाम परवानगी देताना प्रॉपर्टी कार्ड असल्यास इतर कशाची आवश्यकता नसेल असंही मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं. मालमत्ता कर लावण्यापासून ते उद्याच्या पिढीला प्रॉपर्टी नावे करण्याचा मार्ग सुकर होणार आहे. मालमत्ता पत्र यामुळे सहज मिळेल.
गृह कर्ज घेण्यासाठी कागदपत्रं मिळतील. याशिवाय अनेक योजनांसाठी आवश्यक असणारी कागदपत्रं, थेट शेतीचे पैसे मिळणार असतील त्यांना फायदा होईल.दरम्यान देशातील सर्व मंत्री प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहे. या योजनेतून महाराष्ट्रला मजबुती देण्याचे काम होणार आहे. हे प्रॉपर्टी कार्ड आधुनिक युगात नवा आधार देणारे हे कार्ड ठरेल. ड्रोन सर्व्हे ग्रामीण भागात सुरू असून शहरातही लवकरच सुरु होईल,असे बावनकुळे म्हणाले.