नागपूर : आनंदाचा, उत्साहाचा आणि दिव्यांचा उत्सव म्हणजे दिवाळी, दिपोत्सव… लाख लाख दिव्यांनी आसंमत उजळवणारा आणि अनेकांच्या घरातील आणि मनातील ही अंधार दूर करून अवघे वातावरण प्रकाशमान करणारा दिपोत्सव.
सुधारणा व पुनर्वसन हे कारागृह विभागाचे ब्रीद असुन त्या अनुषंगाने नागपूर मध्यवती कारागृह येथे बंदयांकरीता विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. बंदयांचे शारीरिक, मानसिक आरोग्य चांगले रहावे याकरीता कारागृह प्रशासन नेहमी सज्ज असते. कारागृहातील बंदयाकरिता दिवाळी सणानिमीत्त हार्मोनी इवेंटस या म्युझीकल संस्थेचे श्री राजेश समर्थ यांच्या वतीने आज १३ नोव्हेंबर रोजी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन नागपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आले होते.
कारागृहातील दिवाळी पहाट सुरमय करण्यासाठी आणि स्वर मैफिल सजवण्यासाठी झी.टी.व्ही. सा रे गा म पा ची विजेती आंकाक्षा देशमुख, सुप्रसिध्द शास्त्रीय गायक गुणवंत घटवाई. प्रसिध्द गायक दिनेश उइके यांनी आपल्या सुमधूर गीतांनी कारागृहातील बंदयाना मंत्रमुग्ध केले.
ही दिवाळी पहाट कारागृहातील बंदयाकरिता एक संगीताची अनोखी पर्वणी होती. या संगीतमय कार्यक्रमात बंदी बांधव ही मागे नव्हते. बंदयानी या कार्यक्रमाचा आनंद तर घेतलाच त्याच बरोबर बंदयानी ही सुंदर एक से बढकर एक गाणी सादर केली.
सदरील कार्यक्रम अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, पुणे अमिताभ गुप्ता यांचे सुचनेनूसार व मा. श्री जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, पूर्व विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी कारागृह अधीक्षक वैभव आगे, कारागृह उपअधीक्षक श्रीमती. दिपा आगे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी आनंद पानसरे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी आर राऊत, तुरूंगाधिकारी विजय मेश्राम, पंचशीला चव्हाण, उपस्थित होते