मुंबई: एका बाजूला राज्य तसेच देशात अतिरिक्त साखरेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात केली आहे. पाकिस्तानी साखर मुंबईच्या बाजारात आल्याने साखरेचे दर कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे सीमेवर सैनिकांचे बलिदान जात असताना देशात मात्र सैनिकांसह शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल जात आहे.
यंदाच्या हंगामात देशभरात विक्रमी साखरेच उत्पादन झाल आहे. त्यातच मागील हंगामातील अतिरिक्त साखर अद्याप शिल्लक आहे. हे चित्र समोर असताना देखील पाकिस्तानची साखर का आयात करण्यात आली, असा प्रश्न निर्माण होत आहे. मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाकिस्तानची साखर दाखल झाली असून बाजारभावापेक्षा ती १ रुपयांनी कमी किमतीची आहे.
नजीकच्या काळामध्ये राज्य तसेच देशभरात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे, त्यातच सरकारी धोरणामुळे शेकडो साखर कारखाने संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानमधून साखर आयातकरून सरकार नेमक काय करू इच्छिते हे कळत नाही.