नागपूर : – RTM नागपूर युनिव्हर्सिटीच्या दि. 3 ऑगस्ट 2022 च्या आदेशानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ द्वारे जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत पंचायत समिती कळमेश्वर येथे कार्यरत कीर्ती मुकुंद पालटकर (सौ.कीर्ती एन.गव्हाणकर) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त, ब्राह्मणी केंद्राच्या केंद्रप्रमुख, यांना शिक्षणशास्त्र विषयांतर्गत “वैदिक कालीन माण्डूकोपनिषद मधील नैतिक मूल्ये-एक अभ्यास” या विषयातील संशोधनाकरिता आचार्य पदवी पीएचडी बहाल करण्यात आली.
त्यांनी हे संशोधन डॉ.सुषमा शर्मा, माजी प्राचार्य बॅरिस्टर एस.के.वानखेडे शिक्षण महाविद्यालय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरच्या मार्गदर्शनात पूर्ण केलेत. या यशाबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या मार्गदर्शिका डॉ.शर्मा मॅडम, आई सौ.सुशीला वडील श्री मुकूंद, पती श्री.नरेश व सर्व आप्तस्वकीयाना दिले.