Published On : Mon, May 8th, 2023

नागपुरात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 19 मे रोजी

Advertisement

नागपूर :’शासन आपल्या दारी” या शासनाच्या अभिनव संकल्पनेतून राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन 19 मे रोजी करण्यात येत आहे. सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कुल, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, सिव्हिल लाईन्स येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत मेळाव आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात ३० पेक्षा अधिक नामांकित खाजगी आस्थापना/कंपनी बेरोजगार उमेदवारांची मुलाखत घेऊन भरती प्रक्रिया पुर्ण करण्यात येणार आहे. सर्व बेरोजगार उमेदवारांनी रोजगार मेळाव्यामध्ये मोठ्याप्रमाणामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन तथा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग (जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर) यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

Advertisement

ज्या आस्थापनांकडे विविध पदे रिक्त आहेत त्यांनी www.mahaswayam.gov.in या वेबसाईट वर तातडीने अधिसुचित करावे. त्याचप्रमाणे स्थानिक
बेरोजगार उमेदवारांनी नोकरीची आवश्यकता असल्यास सम नमुद वेबसाईटवर आपली नोंदणी पुर्ण करावी. त्याबाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्यास जिल्हा कौशल्य विकास, नागपूर येथील रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,, नविन प्रशासकीय इमारत क्र. 2, दुसरा माळा (विंग-ए), सिव्हील लाईन याठिकाणी किंवा 0712-2531213 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.