रामटेक – महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन ग्रामपंचायत पिपरिया आणि पेंच व्याघ्र प्रकल्प प्रतिष्ठान नागपूर,यांचा संयुक्त विद्धमाने पिपारीया येथे नुकतेच भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत विविध 38 गावातील 43 संघांनी भाग घेतला.
या वेळी रामटेक विधान सभा क्षेत्र चे आमदार आशिष जयस्वाल,जिल्हा परिषद सदस्या शांता ताई कुंभरे,पंचायत समिती सदस्य चंद्रकांत कोडवते,पिपरिया चे सरपंच शेखर खंडाते,बी.डी. ओ. बाळासाहेब यावले,पेंच व्याघ्र प्रकल्प नागपुर चे उपसंचालक, अमलेंदू पाठक,अतुल देवकर ( ए.सी एफ) ,वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे, तसेच वनरक्षक वणानिरिक्षक, तसेच ग्राम प्रेरक दिव्यम् वाळके, खेळाडू, तसेच गावकरी मंडळी उपस्थित होती. यावेळी मान्यवरांनी युवा मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत नेहरू पथरई या संघाने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले व द्वितीय क्रमांक बनेरा तसेच तृतीय क्रमांक STPF या संघाने पटकावले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्राम प्रेरक दिव्यम वाळके तसेच प्रियंका अवारी (वनरक्षक), अम्रपाली पडघान(वनरक्षक),महेश गायकवाड (वनरक्षक),तसेच अमोल कोहळे,रजत मेश्राम,चेतन सोनटक्के,निखिल कोहळे, अमित गजबे, ऋषभ कोडवते, तसेच गावकरी मंडळीनी सहकार्य केले.