Published On : Mon, Apr 15th, 2024
By Nagpur Today Nagpur News

महापालिकेच्या दुर्गानगर शाळेत पालकसभा

नागपूर : नागपूर महापालिके च्या शारदा चौकातील दुर्गानगर माध्यमिक शाळेत १३ एप्रिल रोजी पालकसभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका टेरेसा जॉर्ज होत्या. प्रमुख पाहुणे ममता खुदरे, भारती गजाम, डॉ. वसुधा वैद्य, कृष्णा उजवणे, श्रीकांत गडकरी, रत्ना येळणे, प्रीती पांडे, प्रीती भोयर, सोनल मानकर, नेरीषा चव्हाण उपस्थित होते. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मनपा शाळेत असणाºया विविध उपक्रमांची माहिती जॉर्ज यांनी दिली. दुर्गानगर मनपा शाळेत होत असलेल्या विविध उपक्रमांची चित्रफीत दाखवण्यात आली.

पालकांसाठी मनोरंजनात्मक खेळ डॉ. वैद्य यांनी घेतले. पालकांनी प्रोत्साहनपर रोख बक्षीसही देण्यात आले. हेल्थ केअर, रिटेल, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक खोली, डिजीटल बोर्ड, सुसज्ज मैदान यांची पाहणी पालकांनी केली. खासगी शाळांच्या तुलनेत मनपाच्या शाळेत असलेल्या सुविधा पाहून पालक चकीत झाले. मीट अँड ग्रीट असे या पालकसभेला नाव देण्यात आले होते.

Gold Rate
Tuesday 04 March 2025
Gold 24 KT 86,100 /-
Gold 22 KT 80,100/-
Silver / Kg 95,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपा शाळांत असलेल्या सुविधा
पहिली ते बारावीपर्यंत मोफत शिक्षणाची सुविधा, संपूर्ण वर्गांत डिजीटल बोर्ड, गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास, सुपर ७५ च्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी वर्ग, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विविध उपक्रम, दहावीतील विद्यार्थ्यांची कलचाचणी होणार, शिक्षण उत्सवातून विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक गुणांना वाव. मोफत गणवेश, शाळेत पौष्टिक मध्यान्हभोजन, दूध, अंडी आधी.

Advertisement