रामटेक : आनंदधाम बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट ,रामटेक अंतर्गत आनंदधाम रामटेक च्या वतीने रामटेक तहसील कार्यक्षेत्रातील परमात्मा एक सेवकांच्या वर्ग एक ते बारा मध्ये सन 2018 या वर्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विध्यारथी व विध्यार्थीनींचा सत्कार तसेच त्यांच्या पालकांचा अभिनंदन सोहळा नुकताच परमात्मा एक आनंदधाम,रामटेक येथे संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी,नगराध्यक्ष दिलीप देशमुख,महाराष्ट्र शासन व्यसनमुक्ती गौरव पुरस्कृत लक्ष्मणराव मेहर बाबूजी ,भारतीय खाद्य निगमचे सदस्य विजय हटवार महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष राकेश मर्जीवे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमास सरपंच योगिता गायकवाड, नगरसेवक संजय बिसमोगरे,आलोक मानकर ,नगरसेविका चित्रा धुरई,उज्जला धमगाये ,अनिता टेटवार,माजी नगरसेवक सुनील देवगडे व मान्यवर मंडळी मोठया प्रमाणात उपस्थित होती.
आमदार रेड्डी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वर्ग 1 ते 12 वी पर्यतच्या पास झालेल्या गुणवंत मुलामुलींचा मेडल ,मोमेंटतो व पुशपगुछ देऊन पालकासाहित सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवराची समयोचित भाषणे झाली. गुणवंतांच्या सत्कार समारंभात मार्गदर्शन करताना आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी म्हणाले की ,” समाजातला प्रत्येक मुलगा मुलगी ही आपल्या समाज आणि राष्ट्रयाचा आधार आहे.
त्यांच्या उज्ज्वल ,सुरक्षित भविष्यासाठी पालकांनी जागरूक राहिले पाहिजे .मुलाबाळाची हयगय न करीत त्याच्या चांगल्या शिक्षनासाठी प्रयत्न केले पाहिजे .आपला मुलगा मुलगी उचचशिक्षित होईल आणि निर्व्यसनी राहील याचीही काळजी घेतली पाहिजे.कारण आजचा विद्याthi हा उद्याचे संपन्न राष्ट्र व बसमाज घडविणार आहे”
लक्ष्मणराव मेहर बाबूजी यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बजरंग मेहर ,विनोद देवगडे, दीपक राऊत प्रभुनाथ कोयपरे,अजय खेडगरकर,जगदीश नाकाडे,प्रीती मेहर,दामिनी चौरसिया, सीमाताई नागपुरे,विमालताई नागपुरे यांनी परिश्रम घेतले.