नागपुर– राष्ट्रनिर्माण तसेच पक्ष संघटन विस्तार कार्यक्रम अंतर्गत पक्षाचे ध्येय धोरण आत्मसात करून राष्ट्रीय संयोजक श्री. अरविंद केजरीवाल ह्यांचे नेतृत्व स्वीकारून अनेक नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला.
उत्तर नागपूर शहर विधानसभा क्षेत्र प्रभाग क्र. ०१ येथे आज शनिवार सायंकाळी ७.३० वाजता *मार्टिन नगर, जरीपटका येथे श्री. अमित मोने आणि विल्सन लियोनार्ड ह्यांच्या नेतृत्वाखाली तसेच पक्षाचे उच्चपदस्थ प्रमुख देवेंद्र वानखडे- विदर्भ संयोजक, जगजीत सिंग- राज्य कोषाध्यक्ष, शंकर इंगोले- प्रभारी, भूषण ढाकुलकर सचिव, आकाश सफेलकर, प्रभारी यांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये कार्यक्रम पार पडला.
यावेळी उत्तर नागपुर संयोजक रोशन डोंगरे, संगठन मंत्री पौनिकर, सचिव गुणवंत सोमकुंवर, सह संयोजक मौन्देकर, एलेंन गोरवीन, संजयजी ऑस्ट्रिंन सीमोन, पॉल साहेब आणि इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला.
या शुभ प्रसंगी नोएल जॉन, नेल्सन सीमोन, बबलू पीटर, आरिक जोसेफ, जॉर्जे जोसेफ, प्राची मोने, लिली मोने, भारती मोने, आशा जॉन अल्बर्ट, अलफेड जॉन अल्बर्ट, अनिल फ्रान्सिस, आकाश पाल, मारिओ जी, धीरज ठाकूर, जॉनीजी, मंजूजी इत्यादि नवीन कार्यकर्त्यांनी पार्टी प्रवेश केला.