नागपूर : मनीष नगर रेल्वे क्रॉसिंगजवळ रविवारी, ९ एप्रिल रोजी सकाळी ७.४० च्या सुमारास चालत्या ट्रेनमधून पडून एका ३८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लक्षपती जगतराम पटेल असे मृत प्रवाशाचे नाव असून तो मूळचा लवधीपुरा, बरगट, ओडिशा येथील रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पटेल हा रविवारी नागपूर-मुंबई ट्रेनमधून प्रवास करत होता. ट्रेन मनीष नगर रेल्वे क्रॉसिंगजवळ येताच ट्रेनच्या गेटवर उभ्या असलेल्या पटेल यांचा तोल गेला आणि ते चालत्या ट्रेनमधून खाली पडला. त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसीएच) नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सहकार नगर येथील स्वप्नील शंकर जगनाडे (३०) यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे बेलतरोडी एएसआय सवाईथुल यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.