Published On : Sat, Dec 24th, 2022
By Nagpur Today Nagpur News

विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर होणार कोरोना चाचणी

Advertisement

मनपा आयुक्तांचे निर्देश : संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा

नागपूर : केंद्र शासनाकडून जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशानुसार आंतरराष्ट्रीय विमानाने नागपूर शहरात विदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. केंद्राच्या निर्देशानुसार उद्या शनिवार २४ डिसेंबरपासून शहरात दाखल होणाऱ्या २ टक्के प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी दिले.

Gold Rate
24 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 98,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून प्राप्त दिशानिर्देशाच्या अनुषंगाने शुक्रवारी (ता.२३) आयुक्तांनी संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहात आयुक्तांच्या अध्यक्षतेत यासंबंधी बैठक पार पडली. बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, साथरोग नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांच्यासह सर्व झोनचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) डॉ. भिसे तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) डॉ. खडसे, प्रशासनाचे अधिकारी, ‘नीरी’चे वैज्ञानिक डॉ. कृष्णा खैरनार, विमानतळ प्रशासनाचे अधिकारी श्री. कृष्णा पॉल प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपूर शहरात दोहा आणि शारजा येथून दर आठवड्याला सहा विमाने येतात. उद्या शनिवारपासून या विमानातून येणा-या प्रवाशांची स्क्रिनिंग करून त्यापैकी २ टक्के प्रवाशांची चाचणी करण्यात येणार आहे. चाचणी नंतर घेण्यात आलेले नमूने मेडिकल, एम्स आणि मेयो येथील पॅथॉलॉजीमध्ये पाठविण्यात येणार आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता विमानतळ प्रशासनाशी समन्वयाने कार्य करून चाचणी करण्याबाबत आयुक्तांनी निर्देशित केले आहे.

याशिवाय शहरातील इतर व्यक्तींच्याही चाचणीसाठी मनपाद्वारे ३९ चाचणी केंद्र कार्यान्वीत करण्यात आलेली आहेत. सोबतच लसीकरणावरही भर देण्यात येत आहे. नागपूर शहरात आतापर्यंत कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे एकूण ४३ लाख ८५ हजार ३६४ डोस पूर्ण झालेले आहेत. यापैकी अनेक जण अद्यापही बूस्टर डोसपासून वंचित आहेत. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली रुग्णालय, के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आयसोलेशन हॉस्पीटल, आयुष दवाखाना या पाचही आरोग्य केंद्रांमध्ये बेड्स आणि ऑक्सिजन व्यवस्थेची तपासणी करून संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले आहे. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथेही ऑक्सिजन बेड्सच्या व्यवस्थेबाबत आढावा घेत त्यांनी संभाव्य धोका लक्षात घेता बेड्स तयार ठेवण्याची सूचना मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी केली आहे.

लक्षणे असल्यास त्वरीत चाचणी करा
कोरोना संबंधी कुठलीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी आपल्या जवळच्या कोव्हिड चाचणी केंद्रातून नि:शुल्क चाचणी करून घेण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. शहरात मनपाच्या दहाही झोनमध्ये ३९ चाचणी केंद्रांची व्यवस्था मनपाद्वारे करण्यात आली आहे. अँटिजेन आणि आरटीपीसीआर अशा दोन्ही चाचण्या या केंद्रांवर करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोव्हिड संबंधित कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आपली चाचणी करून घ्यावी. सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर करण्याचेही आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

झोननिहाय कोव्हिड चाचणी केंद्र

झोन क्र. १ लक्ष्मीनगर झोन

– आरपीटीएस मुख्यालय, जेरील लॉन जवळ, नागपूर

– जयताळा यूपीएचसी, जयताळा

– खामला यूपीएचसी, खामला नागपूर

– कामगार नगर यूपीएचसी, कामगार कॉलनी, सुभाष नगर

झोन क्र. २ धरमपेठ झोन

– तेलंखेडी यूपीएचसी, सुदामनगरी

– हजारी पहाड यूपीएचसी, हजारीपहाड

– सदर रोग निदान केन्द्र, कॅनरा बँकेसमोर, सदर

– फुटाळा यूपीएचसी, अमरावती रोड, गल्ली क्र. ३

झोन क्र. ३ हनुमाननगर झोन

– हुडकेश्वर यूपीएचसी, नासरे सभागृह जवळ, हुडकेश्वर

– मानेवाडा यूपीएचसी, व्हॉलिबॉल मैदान, शाहुनगर मानेवाडा

– नरसाळा यूपीएचसी, ग्रामपंचायत कार्यालय, नरसाळा

झोन क्र. ४ धंतोली झोन

– कॉटन मार्केट यूपीएचसी

– बाबुलखेडा यूपीएचसी, मानवता हायस्कूल जवळ

झोन क्र. ५ नेहरूनगर झोन

– नंदनवन यूपीएचसी, दर्शन कॉलनी

– बिडीपेठ यूपीएचसी, त्रिकोणी मैदान बिडीपेठ

– ताजबाग यूपीएचसी, मोठा ताजबाग

– दिघोरी यूपीएचसी, जिजामाता नगर, दिघोरी

झोन क्र. ६ गांधीबाग झोन

– मोमिनपूरा यूपीएचसी, मोमिनपूरा

– स्व. प्रभाकरराव दटके महाल रोग निदान केंद्र, महाल

– भालदारपुरा यूपीएचसी, उर्दू स्कूल गंजीपेठ

– नेताजी रोग निदान केंद्र, गोळीबार चौक

झोन क्र. ७ सतरंजीपुरा झोन

– शांतीनगर यूपीएचसी, मुदलीयार चौक

– मेहंदीबाग यूपीएचसी, मेहंदीबाग

– कुंदनलाल गुप्ता नगर हेल्थ पोस्ट, पंचवटी नगर मैदान

– जगनाथ बुधवारी यूपीएचसी, गोळीबार चौक रोड

झोन क्र. ८ लकडगंज झोन

– पारडी यूपीएचसी, सुभाष मंदिर, पारडी

– डिप्टी सिग्नल यूपीएचसी, संजय नगर शाळेजवळ,

– हिवरी नगर यूपीएचसी, पॉवर हाउस जवळ

– बाबुळबन यूपीएचसी, गरोबा मैदान

– भरतवाडा युपीएचसी, विजय नगर, भरतवाडा

झोन क्र. ९ आशीनगर झोन

– शेंडे नगर यूपीएचसी, शेंडे नगर

– पाचपावली यूपीएचसी, लष्करीबाग मराठी प्राथ. शाळा,

– बंदे नवाज यूपीएचसी, फारूक नगर, टेका

– गरीब नवाज यूपीएचसी, गरीब नवाज नगर

झोन क्र. १० मंगळवारी झोन
– गोरेवाडा यूपीएचसी, संविधान भवन, गोरेवाडा

– इंदोरा यूपीएचसी, बेझनबाग

– जरीपटका रोग निदान केंद्र, जरीपटका

– नारा यूपीएचसी, नारा

Advertisement
Advertisement