नागपूर – नागपूर टेंट हाऊस असोसिएशन नागपूर यांच्या वतीने ऑल महाराष्ट्र टेंट डीलर्स वेल्फेअर ऑर्गानझेशन संपूर्ण महाराष्ट्रात एक दिवसीय उपोषण धरणे आंदोलन संपन्न.
कोवीड-19 मध्ये संपूर्ण महाराष्ट्र मध्ये फक्त पन्नास लोकांची परमिशनच्या अनुषंगाने आम्ही महाराष्ट्र राज्य सरकार ला वेळोवेळी निवेदन दिले. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ५ व्या चरणमध्ये 200 व्यक्तींची परमिशन देण्यात आली. परंतु महाराष्ट्र राज्य सरकारनी दोनशे व्यक्तींची परमिशन लागू केलेली नाही. शुभमंगलम प्रसंग येत असलेल्या असोशियनच्या कुटुंबियांन वरील उपासमारीची वेळ आलेली आहे. महाराष्ट्र राज्य सरकार मा. मुख्यमंत्रीजी आपण जागे व्हा, मंडप डेकोरेशन, केटरिंगवाले बेरोजगार झालेले आहे. आपण तात्काळ शुभमंगलम प्रसंग सुरू नाही केल्यास तर हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही असे नागपूर टेंट हाऊस असोशियन नागपूर व विश्वस्त कार्यकारिणीच्या मंडळाने निर्णय घेतलेला आहे.
आम्ही नितीन गडकरी तसेच महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री यांना दोनशे ते पाचशे लोकांची परमिशन देण्याचे वेळोवेळी निवेदन दिले तरी सुद्धा याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे आमच्या असोसिएशन द्वारा होणारे हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही. असा इशारा दिला. तात्काळ दोनशे ते पाचशे लोकांची परमिशन देण्यात यावी असे निवेदन ही दिले परंतु याकडे सरकारने लक्ष दिले नाही. अध्यक्ष सुनील राऊत यांच्या उपस्थितीत एक दिवसाचे उपोषण सुद्धा केले.
यावेळी सचिन इनकाने, अरुण टिकले, अमरीश अरोरा, रवींद्र तराळे, विजय कापसे, प्रवीण जठठेवार, प्रभाकर आकरे, धनंजय दुधे, बाबा भाई सादिक, रामदासजी मोकदम, गंगाधर नोकरकर, आणि बँड व घोडाबग्गीवाले असोसिएशन व लाइटिंग असोसिएशन चे अध्यक्ष लहानुजी इंगळे, प्रकाश लायटिंगवाले अतुल ढेंगे उपाध्यक्ष, कॅटरिंग, डिस्ले लाईट, भीमराव भाऊ, रवी शर्मा, निलेश शेटीयाँ, केदार भाऊ, विजय भैया, गणेश बघेले यांच्या उपस्थितीत एक दिवसीय उपोषण आंदोलन करण्यात आले. यावेळेस हिवाळी अधिवेशन होऊच देणार नाही असा इशारा दिलेला आहे. नागपूर टेन्ट हाऊस असोसिएशन च्या द्वारे प्रसिद्धी पत्रकात कळविली आहे. कार्यकारी सदस्य सचिन इनकाने यांचा मोबाईल नंबर असा आहे 9822367075 यावरील आपण संपर्क करू शकता.