Advertisement
सध्या शरद पवार यांच्या चौकशीची आम्हाला गरज नाही, पुढे सुद्धा चौकशीची गरज लागणार नसल्याचे ईडीच्या पत्रात नमूद करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई: शिखर बँक घोटाळा प्रकरणी ईडीने शरद पवारांवर गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणी शरद पवार आज दुपारी २ वाजता ईडी कार्यालयात जाणार होते. दरम्यान, ईडी कार्यालयाकडून शरद पवार यांना मेल द्वारे पत्र पाठविण्यात आले असल्याची सूत्रांची माहिती आहे. सध्या शरद पवार यांच्या चौकशीची आम्हाला गरज नाही, पुढे सुद्धा चौकशीची गरज लागणार नसल्याचे ईडीच्या पत्रात नमूद करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.