Published On : Wed, Jun 13th, 2018

ऑनलाईन देयक भरणा कोणत्याही शुल्कविना महावितरणचा ग्राहकांसाठी महत्वाचा निर्णय

Advertisement

Mahavitaran logo

नागपूर : ग्राहकांना ऑनलाईनद्वारे आपल्या वीजदेयकाचा भरणा सुलभतेने करता यावा व अशा ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी क्रेडीट कार्डचा अपवाद वगळता नेट बँकिंग, डिजिटल वॉलेट, कॅशकार्ड डेबिटकार्ड व युपीआय पध्दतीने विजदेयकाचा भरणा केल्यास महावितरणने अशा ग्राहकांना ही सेवा नि:शुल्क केली आहे.

महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे (www.mahadiscom.in) व महावितरणच्या मोबाईल ऍ़पद्वारे ग्राहक विजदेयकाचा ऑनलाईन भरणा करु शकतात. ऑनलाईन विजदेयकाचा भरणा करताना केवळ क्रेडीटकार्डद्वारे भरणा केल्यास ग्राहकांना शुल्क आकारण्यात येईल. उर्वरित इतर सर्व पध्दतीने (नेटबँकींग, युपीआय, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, कॅशकार्ड) विजदेयकाचा भरणा केल्यास ग्राहकांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

Gold Rate
Monday 31March 2025
Gold 24 KT 90,500 /-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg 101,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ऑनलाईन पध्दतीने भरणा केल्यास ग्राहकास त्याच्या नोंदणीकृत मोबाईलवर SMS द्वारे त्वरित पोच मिळते. तसेच www.mahadiscom.in या संकेतस्थळावर Payment History तपासल्यास वीजबील भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते. ऑनलाईन वीजबील भरणा पध्दत अत्यंत सुरक्षित असून यासंदर्भात काही तक्रार अथवा शंका असल्यास ग्राहक helpdesk_pg@mahadiscom.in या ई-मेल आयडीवर महावितरणशी संपर्क साधूशकतात.

ग्राहकांनी वीजबील भरणा केंद्रासमोर रांगेत उभे राहून वीजबील भरण्यापेक्षा महावितरणने उपलब्ध करुन दिलेल्या निशुल्क ऑनलाईन वीजबील भरणा सेवांचा फायदा घ्यावा व विजदेयकाचा भरणा ऑनलाईन करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Advertisement
Advertisement