नागपूर : अमरावती रोडवर वाडी परिसरात गुरुवारी सायंकाळी वेगात असलेल्या एमएसआरटीसीच्या शिवशाही बसने दिलेल्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला.
रोशन बनसोड (४३) असे मृताचे नाव असून, तो प्रभाग क्रमांक १, सूर्या रोड लाईन्स, सुराबुर्डी येथील रहिवासी होता. बनसोड हे सायंकाळी 6.30 च्या सुमारास वडधामना येथील सारंग बार ॲण्ड रेस्टॉरंटसमोर रस्ता ओलांडत होते. भरधाव वेगात आलेल्या शिवशाही बसने (MH-06/BW-0140) बनसोड यांना धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. बस चालकाने तेथून पळ काढला. बनसोड यांना तातडीने मेयो रुग्णालयात नेण्यात आले मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर वाडी पोलिसांनी बस चालक विजय अशोकराव निखाडे (४३, रा. बुटीबोरी) याला अटक करून भारतीय दंड संहितेच्या कलम २७९, ३०४ (अ) नुसार मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४, १७७ नुसार अटक केली. आणि पुढील तपास सुरू केला.