Published On : Tue, Nov 6th, 2018

मिझल्स रुबेला लसीकरणअंतर्गत बालरोग तज्ज्ञांची कार्यशाळा

नागपूर : मिझल्स रुबेला लसीकरण मोहिमेला सर्वच स्तरांतून प्रतिसाद मिळण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय क्षेत्रातील विविध तज्ज्ञांच्या कार्यशाळा घेण्यात येत आहेत. याचअंतर्गत नुकतीच महाल येथील टाऊन हॉलमध्ये आय.ए.पी. (बालरोगतज्ज्ञ संघटना) च्या सदस्यांची कार्यशाळा पार पडली.

मिझल्स रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत ९ महिने तर १५ वर्ष वयोगटातील सर्व मुलांना मिझल्स रुबेलाची लस लागणार आहे. शाळा, अंगणवाड्या, सर्व सरकारी, मनपा दवाखाने आदी ठिकाणी ही लस लागणार आहे. त्याचदृष्टीने बालरोग तज्ज्ञांचा सहभाग या मोहिमेत करून घेण्याच्या दृष्टीने सदर कार्यशाळा पार पडली. लसीकरण मोहिमेला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Gold Rate
Wednesday 26Feb. 2025
Gold 24 KT 86,400 /-
Gold 22 KT 80,400 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कार्यशाळेला आय.ए.पी.चे सदस्य एस.एम.ओ. डॉ. साजीद खान, , डी.आर.सी.एच.ओ. डॉ. आसीम इनामदार, डॉ. नरेंद्र बहिरवार, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, लसीकरण अधिकारी डॉ. सुनील घुरडे, एम.आर. समन्वयक दिपाली नागरे उपस्थित होते.

Advertisement