Published On : Mon, Aug 23rd, 2021
By Nagpur Today Nagpur News

२४ तासांचे ‘गोरेवाडा पेंच-२ आणि पेंच-३ जलशुद्धीकरण केंद्राचे शटडाऊन २४ ऑगस्ट ला

Advertisement

लक्ष्मी नगर झोन, धरमपेठ झोन, गांधीबाग झोन व चिंच भवन जलकुंभ (हनुमान नगर झोन) आणि बोरियापुरा जलकुंभ (सतरंजीपुरा झोन), गिट्टीखदान जलकुंभ  (मंगळवारी झोन)  च्या २५ जलकुंभाचा पाणीपुरवठा राहणार बाधित

  • नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून ठेवण्याची विनंती….
  • शटडाऊन काळात बाधित भागांना टँकरद्वारे पाणीपुरवठा नाही

नागपूर : NRW (Non-Revenue Water) वर सतत निगराणी ठेवणे तसेच नादुरस्त वाल्वे मधून वाया जाणारया पाण्याला वाचविण्याकरिता    महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी संयुक्तपणे गोरेवाडा स्थित पेंच- २ आणि पेंच -३ जलशुद्धीकरण केंद्र येथून निघणार्या मुख्य जलवाहिनीवर फ्लो मीटर लावणे तसेच काही अंतर्गत देखभाल आणि दुरुस्ती चे कामाकरिता,  पेंच- २ आणि पेंच -३ जलशुद्धीकरण केंद्राचे २४ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरवले आहे.

हे शटडाऊन २४ ऑगस्ट (मंगळवार)  सकाळी ८  ते २५ ऑगस्ट (बुधवार)  सकाळी ८ दरम्यान करण्यात येणार आहे . पण २४ तारखेला सकाळचा देखील पाणीपुरवठा होणार नाही. या काळात लक्ष्मी नगर झोन, धरमपेठ झोन, गांधीबाग झोन सतरंजीपुरा झोनचा काही भाग (बोरियापुरा जलकुंभ) व हनुमान नगर झोन (चिंचभुवन  जलकुंभ), मंगळवारी झोन (गिट्टीखदान जलकुंभ) येथील २५ जलकुंभ ह्यां भागांना पाणीपुरवठा होणार नाही तसेच टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा.

Gold Rate
19 April 2025
Gold 24 KT 95,800 /-
Gold 22 KT 89,100 /-
Silver / Kg - 96,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या २४ तासांच्या शटडाऊन काळात खालील महत्वाची कामे करण्यात येतील:

१)      पेंच- ३ च्या आऊटलेट वर १००० मीमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर NRW वर निगराणी करण्याकरिता फ्लो मीटर लावणे तसेच

२)      पेंच- ३ च्या आऊटलेट वर १२०० मी मी व्यासाचा नादुरस्त वाल्वे बदलणे  

३)      सेमिनरी हिल्स टाकीवर ५०० मी मी व्यासाचा वाल्वे बदलणे…  

या २४ तासांच्या शटडाऊन काळात खालील झोन (जलकुंभ ) : भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील:

लक्ष्मी नगर झोन लक्ष्मी नगर जलकुंभ, गायत्री नगर जलकुंभ, प्रताप नगर जलकुंभ, खामला जलकुंभ, टाकळी सिम जलकुंभ आणि जयताळा भाग (जयताळा व रमाबाई आंबेडकर नगर), त्रिमूर्ती नगर जलकुंभ

गांधीबाग झोन सीताबर्डी फोर्ट जलकुंभ, बोरियापुरा/खदान जलकुंभ, किल्ला महाल जलकुंभ

धरमपेठ झोन:  राम नगर जलकुंभ, रामनगर जलकुंभ-२  रायफल लाईन: फुटाळा लाईन: सेमिनरी हिल्स जलकुंभ, सेमिनरी हिल्स जुने जलकुंभ, दाभा जलकुंभ, टेकडी वाडी जलकुंभ , फुटाला लाईन ,  सिविल लाईन , IBM लाईन   

 हनुमान नगर झोन (चिंचभुवन जलकुंभ), सतरंजीपुरा झोन (बोरियापुरा जलकुंभ) , मंगळवारी झोन (गिट्टीखदान जलकुंभ)  

जवळपास २५ जलकुंभ च्या भागांना पाणीपुरवठा होणार नाही तसेच टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा. हि विनंती 

या २४ तासांच्या शटडाऊन काळात मात्र, पेंच- २ आणि पेंच -३ जलशुद्धीकरण केंद्र येथील या शटडाऊन दरम्यान पेंच- १, गोधनी स्थित पेंच- ४ आणि कन्हान जलशुद्धीकरण केंद्र हे सर्व जलशुद्धीकरण केंद्र पूर्णतया कार्यरत राहतील.

Advertisement
Advertisement